मुख्य मजकुराकडे जा

क्लायंट वेळेवर कागदपत्रे पाठवतात. कुणालाही पाठपुरावा करावा लागत नाही.

महिना संपला की Kagzaat प्रत्येक क्लायंटची चेकलिस्ट उघडते, WhatsApp वर क्लायंटच्या भाषेत (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी) आणि ईमेलवर आठवण करून देते, आणि क्लायंट फोनवरच्या लिंकमधून कागदपत्रे अपलोड करतात. तुमची टीम रिव्ह्यू करते. पार्टनर मंजूर करतात.

तुमच्याच क्लायंटसोबत 14 दिवस मोफत. सुरुवातीला पेमेंटची माहिती लागत नाही.

Shree Sai Packaging चे Rahul यांना WhatsApp वर त्यांच्या भाषेत विनंती मिळते, आणि त्यांची कागदपत्रे एकाच फोल्डरमध्ये येतात, आली तशी चेकलिस्टवर नोंदली जातात. क्लायंट आणि फर्म काल्पनिक आहेत.

एका GST महिन्यात काय होते

उदाहरण: ऑक्टोबर 2026 चा GST. तारखा Kagzaat च्या स्वतःच्या कॅलेंडरनुसार, रविवार आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्या वगळून.

  1. रविवार, 1 नोव्हेंबर

    महिना संपताच चेकलिस्ट उघडते

    ऑक्टोबर संपला की प्रत्येक GST क्लायंटची चेकलिस्ट उघडते: विक्री रजिस्टर, खरेदी रजिस्टर, सर्व खात्यांचे बँक स्टेटमेंट, क्रेडिट आणि डेबिट नोट. कागदपत्रांसाठी तुमच्या फर्मचा कट-ऑफ 4 नोव्हेंबर.

  2. सोमवार, 2 नोव्हेंबर

    क्लायंटच्या भाषेत WhatsApp मेसेज

    रविवार हा शांत दिवस, म्हणून मेसेज सोमवारी जातो. प्रत्येक क्लायंटसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत, अपलोड लिंकसह मेसेज तयार असतो. तुमच्या टीममधील कोणी Today पानावरून Send on WhatsApp दाबते, आणि मेसेज तुमच्या फर्मच्याच नंबरवरून जातो. ईमेल आपोआप जातो (इंग्रजीत).

  3. कट-ऑफ: 4 नोव्हेंबर

    क्लायंट फोनवरून अपलोड करतो

    ॲप नाही, पासवर्ड नाही: लिंक उघडून प्रत्येक कागदपत्रासमोरचे Upload बटण दाबायचे. प्रत्येक फाइल येताच तपासली जाते: दुसऱ्या महिन्याची फाइल तपासणीसाठी तुमच्या टीमकडे जाते, आणि तीच फाइल पुन्हा आली तर दुसऱ्यांदा साठवली जात नाही. कट-ऑफच्या आदल्या दिवशी एकच रिमाइंडर जातो, फक्त बाकी कागदपत्रांचा.

  4. GSTR-1: 11 नोव्हेंबर

    टीम रिव्ह्यू करते, पार्टनर मंजूर करतात

    सर्व आवश्यक कागदपत्रे आली की चेकलिस्ट रिव्ह्यूसाठी तयार होते आणि पुढचे रिमाइंडर जात नाहीत. तुमची टीम फाइल्स पाहते, काही चुकले असेल तर कारण लिहून क्लायंटकडे परत पाठवते, आणि पार्टनर मंजूर करतात. 11 नोव्हेंबरला GSTR-1 आणि 20 नोव्हेंबरला GSTR-3B, त्याआधी कागदपत्रे तयार.

फोनवरील क्लायंटचे अपलोड पान, CA फर्मच्या नावाने: ऑक्टोबरची GST चेकलिस्ट, दोन कागदपत्रे मिळालेली आणि बाकी प्रत्येकासाठी Upload बटण, कागदपत्रांची नावे मराठीतही.

तुमच्या क्लायंटला काय दिसते

तुमच्या फर्मच्या नावाने एक पान, त्यांच्या हातातल्या फोनसाठी बनवलेले.

मराठी
खरेदी रजिस्टर
हिंदी
खरीद रजिस्टर
इंग्रजी
Purchase register
एकच कागदपत्र, तीन भाषांत: अपलोड पानावर इंग्रजी नावासोबत क्लायंटच्या भाषेतील नावही दिसते.
  • काही इन्स्टॉल करायचे नाही. लिंक फोनच्या ब्राउझरमध्ये उघडते. अकाउंट नाही, पासवर्ड नाही.
  • प्रत्येक कागदपत्रासाठी एक बटण. काय हवे आणि का, हे प्रत्येक कागदपत्रावर लिहिलेले असते, आणि मराठी किंवा हिंदी वाचणाऱ्या क्लायंटसाठी त्याचे नाव त्या भाषेतही.
  • या महिन्यात काहीच नाही? तुम्ही परवानगी दिलेल्या कागदपत्रासाठी, उदा. या महिन्यात क्रेडिट नोट नसेल तर, क्लायंट एका टॅपमध्ये तसे सांगतो.
  • प्रत्येक फाइलची पावती. फाइल तुमच्यापर्यंत पोहोचली आणि अजून काय बाकी आहे, हे क्लायंटला लगेच कळते.
  • क्लायंटची संमती नोंदवली जाते. पहिल्या अपलोडआधी एक छोटी प्रायव्हसी नोटीस दिसते. आधी पाठवलेल्या फाइल्स OTP नंतरच उघडतात.

दरमहा ₹2,999 पासून

18% GST वेगळा. किंमत तुम्ही किती क्लायंटकडून कागदपत्रे गोळा करता त्यानुसार ठरते (Starter प्लॅनमध्ये 100 सक्रिय क्लायंट). प्रत्येक प्लॅनमध्ये सर्व सुविधा आहेत. सर्व प्लॅन पाहा (इंग्रजी पान)

पार्टनर विचारतात ते प्रश्न

क्लायंटला ॲप किंवा पासवर्ड लागतो का?

नाही. तुमच्या मेसेजमधील लिंक उघडून ते फोनच्या ब्राउझरमधूनच अपलोड करतात. लिंक 14 दिवस चालते आणि फोन 30 दिवस साइन इन राहतो, त्यामुळे पुढच्या महिन्याची लिंक लगेच उघडते.

WhatsApp मेसेज कोणत्या नंबरवरून जातात?

तुमच्या फर्मच्याच. Kagzaat प्रत्येक मेसेज क्लायंटच्या भाषेत, अपलोड लिंकसह तयार करते आणि तुमच्या टीममधील कोणी Today पानावरून Send on WhatsApp दाबते; WhatsApp मजकुरासह उघडते. क्लायंटला तुमचाच नंबर दिसतो आणि ते नेहमीप्रमाणे तुम्हालाच उत्तर देतात. ईमेल आपोआप जातो, इंग्रजीत.

क्लायंटने मागच्या महिन्याचे स्टेटमेंट पाठवले तर?

फाइलच्या नावात दुसरा महिना दिसला तर फाइल नाकारली जात नाही; ती ठेवली जाते आणि तुमच्या टीमसाठी वेगळी दाखवली जाते. कोणीतरी ती पाहून स्वीकारते किंवा कारण लिहून परत पाठवते, आणि क्लायंटला पुन्हा विचारले जाते. तीच फाइल दोनदा आली तर ती दुसऱ्यांदा साठवली जात नाही.

कोणत्या रिटर्न्ससाठी वापरता येते?

GST मासिक आणि QRMP, TDS रिटर्न आणि चलन, ॲडव्हान्स टॅक्स, व्यक्ती, व्यवसाय आणि ऑडिट केसेससाठी ITR, टॅक्स ऑडिट, ROC आणि LLP चे वार्षिक फायलिंग, PF आणि ESI. प्रत्येकाची स्वतःची चेकलिस्ट असते, जी तुम्ही बदलू शकता, आणि वैधानिक तारखा कॅलेंडरमधून येतात.

Kagzaat रिटर्न फाइल करते का? GST पोर्टलशी जोडलेले आहे का?

नाही. Kagzaat कागदपत्रे मिळवते, तपासते आणि रिव्ह्यूपर्यंत पोहोचवते. रिटर्न तुमची टीम आजच्यासारखीच तयार करून फाइल करते. पार्टनर एका कालावधीच्या सर्व फाइल्स zip मध्ये, क्लायंट आणि कागदपत्रानुसार फोल्डरमध्ये, डाउनलोड करू शकतात.

आमचा डेटा कुठे ठेवला जातो?

डेटाबेस मुंबईत आहे. फाइल्स Cloudflare R2 मध्ये, Asia-Pacific मधील ठिकाणी ठेवल्या जातात, जे भारताबाहेर असू शकते. प्रत्येक फर्मचा डेटा डेटाबेसच्या पातळीवरच वेगळा ठेवला जातो.

ट्रायल संपल्यावर काय होते?

तुम्ही प्लॅन निवडला असेल तर पहिले पेमेंट तेव्हा घेतले जाते. नसेल तर फर्म फक्त पाहण्यापुरती (read-only) होते: सर्वजण साइन इन करून सर्व काही डाउनलोड करू शकतात, पण नवीन काहीही पाठवले जात नाही. काहीही डिलीट होत नाही.

ॲप मराठीत आहे का?

क्लायंटला जाणारे WhatsApp मेसेज मराठी, हिंदी किंवा इंग्रजीत असतात, आणि अपलोड पानावर कागदपत्रांची नावे मराठी किंवा हिंदीतही दिसतात. तुमच्या टीमचे ॲप आणि नोंदणी फॉर्म सध्या इंग्रजीत आहेत.

पुढच्या महिन्याच्या GST वर वापरून पाहा.

14 दिवस मोफत, Growth प्लॅनच्या मर्यादांसह. मार्गदर्शित सेटअपमध्ये तुमची टीम, क्लायंट आणि चेकलिस्ट जोडल्या जातात, आणि तुम्ही रिमाइंडर सुरू करेपर्यंत क्लायंटला काहीही जात नाही.

चेकलिस्ट उघडतात
रविवार, 1 नोव्हेंबर
तुमचा कट-ऑफ
बुधवार, 4 नोव्हेंबर
GSTR-1 ची मुदत
बुधवार, 11 नोव्हेंबर
GSTR-3B ची मुदत
शुक्रवार, 20 नोव्हेंबर
मोफत ट्रायल सुरू करा

नोंदणी फॉर्म इंग्रजीत आहे.